fbpx

परभणीतील तरूण शेतक-याची आत्महत्या

परभणी : सावकारी कर्ज काढून दोनदा पेरणी केल्यानंतर सुद्धा पावसाने दगा दिला आणि शेत तर पिकले नाही पण कर्जाचा फास बसला या चिंतेमुळे तरूण शेतकरी चांडीराम एडके याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. पाथरी तालुक्यातील जवळा झुटा येथे ही घटना घडली असून जवळा झुटा गावातच पंधरा दिवसात शेतकरी आत्महत्येची ही तिसरी घटना घडली आहे. पाथरी तालुक्यातील जवळा झुटा येथील चांडीराम सुखदेव एडके (वय ३५) हा तरुण शेतकरी गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता होता. आज सकाळी शिवारातील एका पडीक विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलिसांनी पंचनामा केला.हा अल्पभूधारक शेतकरी होता आणि त्यांच्याकडे तीन एकर शेती होती. तिघा भावात ही शेती असल्याने दरवर्षी एकजण शेती करत असे यावर्षी चण्डिकारामकडे शेती होती, खाजगी कर्ज काढून पेरणी केली मात्र पाऊस पडला नसल्याने शेतात पेरलेले उगवले नसल्याने तो नैराश्यात होता, त्यातूनच ही आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.