ब्ल्यू व्हेलमुळे आणखी एकाची आत्महत्या

blue-wale-suicide-game

मदुराई : ब्ल्यू व्हेल गेमच्या नादी लागून तमिळनाडूमधील आणखी एका १९ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्याचे नाव विग्नेश असून तोमदुराईमधील कलाईनगर भागात वास्तव्यास होता. विग्नेश याच्या आत्महत्येनंतर घरात पत्र सापडले. त्या पत्रात त्याने ब्ल्यू व्हेल गेमचा उल्लेख केला होता. त्याच्या हातावर त्याने ब्ल्यू व्हेल माशाचा आकार कोरला होता. या गेम खेळायला सुरूवात केल्यानंतर कोणाचीही यातून सुटका होवू शकत नाही, असे त्याने या पत्रात नमूद केले होते.  विग्नेश हा बी. कॉमच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. या गेममुळे आत्महत्या होण्याची ही तमिळनाडूमधील पहिलीच घटना आहे. यापूर्वीही अनेकांनी गेमच्या आहारी जाऊन आपले आयुष्य संपवले आहे.