fbpx

साखर कारखाना प्रशासनाने मजूरांच्या आरोग्याबाबत दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी

sugarcane

सांगली : साखर कारखाना प्रशासनाने मजूरांचा हिवताप, मलेरिया, डेंग्यू सारख्या आजारापासून बचाव करण्यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी. मजूरांना फिरत्या शौचालयाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. फिरत्या शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देणे शक्य नसल्यास चांगल्या पध्दतीचे तात्पुरते स्वरूपाचे शौचालय मजूरांकरिता बांधावेत. मजूरांना शौचालयाची सुविधा उपलब्ध करून दिली नसल्याचे आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी येथे दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक यांच्या समेवत आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी काळम म्हणाले, ऊस वाहनांमुळे होणाऱ्या अपघाताबाबत कारखान्यांनी योग्य ती दक्षता घेण्याचे आदेश देवून जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांवार रेडीएशन प्लेट लावणे बंधनकारक आहे. आरटीओ विभागाने ज्या वाहनांवर रेडीएशन प्लेट लावलेले नाहीत अशा वाहनांवर कारवाई करावी. अपघात टाळण्यासाठी ऊस वाहने रस्त्यावर उभी न करता ती मोकळ्या जागेत रस्त्यापासून दूर उभी करावीत. सहकारी साखर कारखान्यांनी अडगळीच्या ठिकाणी, टायर ठेवलेल्या ठिकाणी पाणी साठून डास आळ्या होवू नयेत यासाठी औषध फवारणी करून डासांच्या उत्पत्तीवर प्रतिबंध करावा. मलेरिया विभागाने सर्व सहकारी साखर कारखानाच्या ठिकाणी जावून प्रत्यक्ष पाहणी करावी. याबाबत काही त्रुटी आढळल्यास योग्य ती कारवाई करावी. सहकारी साखर कारखान्यांनी किमान दोन आरोग्य कर्मचाऱ्यांची आरोग्य विषयक कामासाठी नेमणूक करावी. मजूरांचे सर्व्हेक्षण करून रक्तनमुने संकलन, संशयीत ताप रूग्णाचा सीआरटी उपचार, हिवताप दुषिता करीता समुळ उपचार व पाठपुरावा करावा. आरोग्य कर्मचाऱ्यांकडून कारखाना परिसरामध्ये आठवड्यातून एकवेळ डासअळी सर्व्हेक्षण करून डासअळी आढळून आलेल्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. कोणत्याही प्रकारे साथीच्या आजारांचा फैलाव होऊ नये याची काळजी घ्यावी.याबाबतचे लेखी आदेश जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना द्यावेत असे आदेश त्यांनी यावेळी दिले.

जिल्ह्यातील साखर कारखाने व्यवस्थित चालण्यासाठी जिल्ह्यातील ऊस इतर राज्यात जात असेल तर संबंधित कारखान्यांनी पोलीस स्टेशनला कळवावे, अशा सूचना करून जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, महाराष्ट्रातील ऊस उत्पादक जर बाहेरच्या राज्यातील कारखान्यांचे सभासद असतील तर त्यांच्या ऊसाच्या शेतीच्या प्रमाणातच इतर राज्यातील कारखान्यांकडे ऊस वाहतूक करू शकतील. सर्व साखर कारखान्यांनी ऊसतोड मजुरांच्या स्थलांतरांचे नियोजन करून ज्या गावात ऊसतोडणीसाठी जातील तेथील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व कारखान्याच्या गट कार्यालयात व ग्रामसेवक यांना मुकादम यांनी स्थलांतराबाबत माहिती द्यावी.

1 Comment

Click here to post a comment