‘महाविकास आघाडीचे यश भाजपच्या डोळ्यात खुपतेय’, अशोक चव्हाणांचा टोला

ashok chvan vs devendra fadanvis

नांदेड : देशात भाजप सरकार स्व हिताच राजकारण करुन सामान्य जनतेला छळते आहे. राज्यातील आघाडी सरकार लोकहिताची कामे करुन विकासाकडे वाटचाल करीत आहे. केंद्राकडून मदत करताना मात्र हात आखूडता घेत आहेत‌. दिड वर्षात महाविकास आघाडी सरकारला मिळालेले यश भाजपच्या डोळ्यात खुपत आहे असे प्रतिपादन काँग्रेस नेते तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. ते नांदेड जिल्ह्यातील भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन इमारतीच्या लोकापर्ण सोहळ्यात बोलत होते.

दरम्यान, अशोक चव्हाण यांनी शिवसेनेनेला डावलून एका प्रकल्पाचं उद्घाटन केल्यामुळे सेनेने रविवारी चव्हाण यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला होता. यावर चव्हाण म्हणाले की, ‘शिवसेना हा घटक पक्ष आहे. त्यांनी कार्यक्रमात सहभागी व्हायला हवे होते. मी पालकमंत्री आहे, माझे काही अधिकार आहेत’.

तो निर्णय आम्हाला मान्य करावा लागेल

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढविणार असल्याचं वारंवार सांगत आहेत. यावरही अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली. जेव्हा प्रदेशाध्यक्षांनी स्वबळाची भूमिका मांडली आहे तर तो पक्षाचा निर्णय म्हणून आम्हाला मान्यच करावा लागेल, असं मत चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे.

मोर्चा काढून काय होणार?

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यातील काही मराठा संघटना आक्रमक झाल्या असून, राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी १६ जून रोजी कोल्हापुरात मराठा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीत गेला असून, केंद्र सरकार यावर संसदेत मार्ग काढू शकते. यामुळे या प्रश्नावर राज्यात मोर्चा काढून काय निष्पन्न होणार,’ असा प्रश्न मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP