ब्रेकिंग-मंत्रालय कि आत्महत्यालय? आणखी एका विद्यार्थाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : मंत्रालयात आत्महत्येच त्र सुरूच आहे. जमिनीच्या मोबदल्यासाठी सरकारच्या विरुद्ध लढा देणारे शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर अहमदनगरच्या अविनाश शेटे या २५ वर्षीय तरुणानं मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आज (गुरवार) पुन्हा  पैठण येथील हर्षल रावते वय (३०) वर्ष हा मंत्रालयात जखमी अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी त्याला उपचारासाठी सेंट जॉर्ज हॉस्पिटल मध्ये नेले आहे.

धर्मा पाटील प्रकरणानंतर तिसरी घटना, काल नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील एका विद्यार्थ्याने मंत्रालयाच्या गेट समोर आत्मदाहनाचा प्रयत्न केला होता, त्यापूर्वी मंत्रालयात एका शेतकऱ्याकडून विषाची बाटली जप्त करण्यात आली होती. आज मंत्रालयाच्या नवीन इमारतीतील त्रिमूर्ती पॅसेज मध्ये हर्षल रावते या युवकाने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

bagdure

६ महिन्यांपूर्वी असच मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर जाऊन एका तरुणाने उडी मरण्याची धमकी दिली होती. पण तो तरुण राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असल्याचं सांगत सरकाने या प्रकरणाकडे कानाडोळा केला होता. पण महाराष्ट्रातील बेरोजगार तरुण, शेतकरी मंत्रालयात येऊन हे टोकाचे पाऊल का उचलत आहेत याकडे खरच लक्ष दिलं पाहिजे.

You might also like
Comments
Loading...