मराठा समाजातील विद्यार्थी शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित

पुणे : महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या मराठा समाजातील आठ लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमामध्ये निम्मे शुल्क घेऊन प्रवेश देण्याचा निर्णय राज्य शासनाने नुकताच  घेतला. परंतु त्याचा अध्यादेश शिक्षणसंस्था व महाविद्यालय प्रशासनाला प्राप्त झालेला नाही. नुकतीच महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांमध्ये या विषयात संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे यामुळे मराठा समाजातील अनेक विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे.

आज अभाविप पुणे महानगराच्या वतीने मा. जिल्हाधिकारी कार्यालय उप जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी अभाविप महाराष्ट्र प्रदेशमंत्री अभिजीत पाटील, पुणे महानगर सहमंत्री अनिल ठोंबरे, गणेशखिंड नगर मंत्री योगेश्वर राजपुरोहित,येरवडा नगर मंत्री शुभम भूतकर,शार्दूल भेगडे, विशाल जवंजाळ, सुदर्शन खाडे, सिद्धार्थ गिरमे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मराठा समाजातील आठ लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमामध्ये निम्मे शुल्क घेऊन प्रवेश देण्याचा निर्णय राज्य शासनाने मध्यंतरी घेतला अभाविप या निर्णयाचा स्वागत करते, परंतू या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाहीये. राज्यसरकारने निदान शैक्षणिक क्षेत्रात तरी फक्त घोषणाबाजी करू नये. राज्यशासनाचा आम्ही निषेध करतो व याविषयात त्वरित अध्यादेश नाही काढला तर आम्ही निर्णायक आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला.