विद्यापीठ निवडणुकीच्या तोंडावर विद्यार्थांमध्ये वाद

studant crime

पुणे : सावित्राबाई फुले विद्यापीठाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. गेल्या काही दिवसात विद्यापीठात अभाविप आणि एसएफआय एकमेकांसोबत चर्चात्मक भिडले होते. पोलिसांच्या मध्यस्थी नंतर सदर वाद मिटला होता. काल सोमवारी संध्याकाळी ६:३० च्या दरम्यान विद्यापीठातील कँटीन समोर काही विद्यार्थ्यांनी राडा घातला. त्यामुळे कँटीन परिसरात काहीवेळ तणावाचे वातावरण होते. सध्या विद्यापीठात निवडणुकीचे वातावरण असून विद्यापीठामार्फत सुरक्षाव्यवस्था शून्य दिसून येत आहे.
विद्यापीठ कायद्यात बदल झाल्यानंतर यावर्षी विद्यापीठात पहिल्यांदा निवडणूक होऊ घातली आहे. मात्र विद्यापीठ प्रशासन याबाबत गंभीर नसून विद्यापीठातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण  होत आहे.
काही दिवसांपूर्वी विद्यापीठात अभाविप आणि एसएफआय कार्यकत्यांमध्ये हाणामारी झाली होती. दोन्ही संघटनेच्या कार्यकार्त्यांवर पोलिसात गुन्हां दाखल असून सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. त्यानंतर पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्ये निषेधार्थ झालेल्या सभेत विद्यार्थी आमने सामने आले होते. विद्यापीठात गुन्हेगारी वाढली असून विद्यार्थांवर कोणाचा दबाव राहिला नाही असे दिसून येते.
.यासंदर्भात विद्यापीठाचे कुलसचिव अरविंद शाळीग्राम यांचाशी संपर्क साधला असता ते म्हणाले सुरक्षेसाठी एक समिती नेमली आहे. तसेच आठवडाभरात पुणे पोलिसांकडून सर्व्हे चा अहवाल येईल. त्यानंतर सुरक्षारक्षकांची संख्या वाढवण्यात येईल.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
राष्ट्रवादी-मनसेचे कार्यकर्ते भिडले