कोगनोळी : राज्यावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंगावू लागले आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कर्नाटक सरकारकडून खबरदारीचे पाऊल उचलले गेले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोल नाक्यावर महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी केली जात आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता कर्नाटक सरकारने कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल अनिवार्य केल्याने अनेक प्रवाशांचा खोळंबा होत आहे.
यानंतर, गृहराज्यमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त करत महाराष्ट्र देखील कर्नाटक मधील प्रवाशांना महाराष्ट्रात घेताना विचार करावा लागेल, असा इशारा काल (दि. २२ फेब्रुवारी) रोजी दिला होता. मात्र, आजही कर्नाटक सरकारचा आडमुठेपणा वाढलेला दिसत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस (एसटी) कोगनोळी टोल नाक्यावर अडवल्या जात आहेत.
महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांना कर्नाटक सरकारने प्रवेशबंदी केली आहे. केवळ 72 तासाच्या आतील कोरोना निगेटिव्ह असलेल्यांनाच कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. पूर्वकल्पना न देता अशी अडवणूक केली जात असल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा होत आहे. तर, आता एसटी बसेसची देखील अडवणूक करण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, ‘महाराष्ट्रतील नागरिकांची आरटीपीसीआर टेस्ट करुन त्यांना कर्नाटकमध्ये प्रवेश द्यावा. कर्नाटक सरकारने प्रवाशांची कोरोना चाचणी करून त्यांना क्वॉरन्टाईन करावं, आम्हाला काहीही हरकत नाही,’ अशी भूमिका सतेज पाटील यांनी स्पष्ट केली होती.
महत्वाच्या बातम्या
- ‘संजय राठोड हे बोटचेप्या ठाकरे सरकारमधील गजा मारणे आहेत’
- भाजप आ.नमिता मुंदडा यांनी केली मागणी, महाविकास आघाडी सरकारने घेतली दखल
- ‘शिवजयंतीला नियम, पोहरादेवीला गर्दी; हेच का समसमान वाटप?’
- ‘मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला राठोड सर्मथकांचा हरताळ, आता ठाकरी बाणा दाखवून कारवाई करावी’
- ‘शिवजयंतीला शिवनेरीवर १४४ कलम लावणाऱ्या महाभकास आघाडीला आज कोरोनाची भिती वाटली नाही’