नाशिक जिल्ह्यातील ११ धरणांचा पाणी साठा १०० टक्क्यावर

नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असून नाशिक जिल्ह्यातील तब्बल ११ धरणे १०० टक्के भरली असून ७ धरणातील पाणी साठा ९० तक्क्याहून अधिक झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील हरणबारी, केळझर, वालदेवी, कडवा, भोजापूर, भावली, तिसगाव, ओझरखेड, वाघाड, करंजवन, आळंदी या अकरा धरणात एकूण १०० टक्के पाणी साठा झाला आहे.

तर गंगापूर ९२ टक्के, कश्यपी ९८, गौतमी गोदावरी ९९, पालखेड ८५,पुणेगाव ९६ टक्के,दारणा ९९,मुकणे ७५,चणकापूर ९२,गिरणा ५७ पुनद ८९ माणिकपुंज ७१ असा जिल्ह्यातील एकूण पाणीसाठा ८३ टक्क्यावर पोहचला आहे. गेल्या महिनाभरात नाशिक जिल्ह्यात सरासरी २८१.८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

You might also like
Comments
Loading...