उद्धव ठाकरेंच्या नव्हे तर ‘यांच्या’ गाडीवर झाली दगडफेक

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाहन ताफ्यावर दगडफेक झाल्याचे वृत्त आले होते. मात्र ही दगडफेक उद्धव ठाकरे यांच्या वाहनावर नव्हे तर आमदार विजय औटी यांच्या गाडीवर झाली आहे. ठाकरे यांची वाहने पुढे गेल्यानंतर मागे असलेल्या गाडीवर दगडफेक झाली. यात कोणीही जखमी झालेले नाही, असे शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी सांगितले.

शिवसेनेचे तालुका प्रमुख म्हणून काम करीत असताना त्यांनी तालुक्यात सेना मोठ्या प्रमाणात सेना वाढवलेली आहे. पण सध्या आमदार विजय औटी आणि लंके यांच्यात वाद आहेत. निलेश लंके हे कट्टर शिवसैनिक आहेत. कार्यक्रमास नीलेश लंके उपस्थित नव्हते. त्यामुळेच लंके यांच्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केली. नीलेश लंके यांची पत्नी राणी लंके या जिल्हा परिषद निवडणूकीत सेनेकडून निवडून आलेल्या आहेत. नीलेश लंके हे आगामी विधानसभा निवडणूक लढण्याचा तयारीत आहेत.

You might also like
Comments
Loading...