शेअर बाजाराच्या निर्देशांकात २८ अंकांची वाढ

mumbai share market

मुंबई : मुंबर्इ शेअर बाजाराचा निर्देशांक आज २८.०५ अंकांच्या वाढीसह ३१,५९६वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ४.५५ अंकांनी वधारून ९,८५७वर बंद झाला. मुंबर्इ शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळच्या सुमारे १०५ अंकांनी वधारून ३१,६७३.४४ वर उघडला. निर्देशांकाने दिवसभरात ३१,६७८ची उच्चांकी आणि ३१,५४६ची नीचांकी पातळी गाठली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक २९ अंकांच्या वाढीसह ९,८८१ अंकांवर उघडला. निर्देशांकाने ९,८८२ची उच्चांकी आणि ९,८४९ची नीचांकी पातळी गाठली.