शेअर बाजार कोसळला ; हर्षद मेहतासारखा आणखी एक घोटाळा ?

share market

नवी दिल्ली : आज सोमवार म्हणजेच शेअर बाजाराचा आठवड्यातील पहिला दिवस. मात्र दिवसाची सुरूवात आर्थिक जगतात मोठ्या धमाक्याने झाली. आज शेअर बाजार उघडताच एका ट्विटने खळबळ उडवून दिली. शेअर बाजारातील आजवरच सर्वात मोठा हर्षद मेहता स्कॅम उघड करणाऱ्या सुचेता दलाल यांनी हे ट्विट केले होते.

‘सेबीकडे असलेल्या ट्रॅकिंग यंत्रणेकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या बाहेर असलेला आणि उघडकीस येण्यास अवघड असलेला आणखी एक घोटाळा. एका समूहाच्या मूल्यात सातत्याने हेराफेरी सुरु आहे. परदेशातील संस्थ्यांच्या मदतीने हा सगळा प्रकार सुरु आहे.तेच त्यांचे वैशि वैशिष्ट्य आहे, काहीच बदलले नाही’ अशा आशयाचे ट्वीट सुचिता दलाल शनिवार यांनी केले त्याचा परिणाम आज सकाळ पासूनच शेअर बाजारात पाहायला मिळत आहे.

या ट्वीटमुळे अदानींच्या कंपनीचे शेअर धडाधड कोसळू लागले. पहिल्यांदा अदानी एंटरप्राइजला लोअर सर्किट लागले, नंतर अदानी ग्रीन्स आणि त्यांच्या कंपन्यांची रांगच लागली. नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेडने तीन परदेशी फंडवर मोठी कारवाई केली. यामध्ये Albula Investment Fund, Cresta Fund आणि APMS Investment Fund यांचा समावेश आहे. ही कारवाई 30 मेच्या दरम्यानेच केल्याचे सांगितले जात आहे. या फंडकडे अदानींच्या 4 कंपन्यांचे 43,500 कोटींहून अधिक रुपयांचे शेअर आहेत. या फंडचे अकाऊंट फ्रीज करण्यात आले आहे.

फक्त एका तासातच अदानींच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये २० टक्क्यांपर्यतची घसरण नोंदवण्यात आली. आशियातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती असलेल्या गौतम अदानी यांच्या संपत्तीत थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ७.६ अब्ज डॉलरची म्हणजेच जवळपास ५५,००० कोटी रुपयांची घसरण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP