वा रे पठ्ठ्या ! ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ काढला विकायला, जाणून घ्या किंमत

केवडिया : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा आणि जागतिक आश्चर्यांमध्ये स्थान मिळवणाऱ्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हे पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. मात्र हेच ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ विकण्यास काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केवडिया जिल्ह्यातील केवडिया पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुजरात मधील केवडिया जिल्ह्यामध्ये ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ उभारण्यात आला आहे. जगभरातून अनेक पर्यटक ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पाहण्यासाठी येत असतात. मात्र कुणीतरी खोडसाळपणा करत ‘ओएलएक्स’वर ही जाहिरात पोस्ट केली आहे. दरम्यान,या सर्व प्रकारामुळे एकच खळबळ उडाली.  आता ओएलएक्स या ॲप वर तसेच ही जाहिरात प्रसिद्ध करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने स्टॅच्यू ऑफ युनिटी ओएलएक्स वर विकण्याची जाहिरात टाकली. 30 हजार कोटी इतकी रक्कम ही जाहीर केली. ही बातमी स्थानिक प्रशासनाला मिळाल्यानंतर त्यांनी ओएलएक्स विरोधात तसेच जाहिरात टाकणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी हालचाल सुरू केली.