मध्यरात्री गावातील वीज पुरवठा बंद करुन बेळगावात शिवरायांचा पुतळा पुतळा हटवला

shivaji maharaj

बेळगाव : बेळगावात एक संतापजनक कृत्य समोर आलं आहे. बेळगावातील एका गावातून चक्क छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला आहे. मनगुत्ती गावातील शिवरायांचा पुतळा हटवण्यात आला आहे. काल (7 ऑगस्ट) रात्री हा पुतळा काढण्यात आला आहे.

शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने शिवभक्तांमध्ये एकच संताप पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील शिवभक्त उद्या (9 ऑगस्ट) कर्नाटकात जाऊन आंदोलन करणार असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे.

मणगुत्ती गावातील चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता, गेल्या २ वर्षापासून हा पुतळा बसवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी सहा महिन्यांपूर्वी चबुतरादेखील तयार केला. या चबुतऱ्यावर गुरुवारी ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. मात्र गावातील काही समाजाच्या लोकांनी याला विरोध केला. त्यांनी छत्रपतींचा पुतळा काढण्याचा प्रयत्न केला.

तणाव वाढल्याने गावात स्थानिक प्रशासन आणि पोलीस दाखल झाले. गावात ८० टक्क्याहून जास्त मराठी बांधव असल्याने त्यांनी मूर्ती हटवण्यास विरोध केला. पुतळा बसवण्यासाठी पोलीस आणि तहसिलदारांची परवानगी नसल्याचं प्रशासनाने सांगितले. यानंतर ही मूर्ती प्लास्टिकने झाकण्यात आली.

दरम्यान, शुक्रवारी समर्थक आणि विरोधक गटांना समोरासमोर बसवून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला गेला.परंतु शिवाजी महाराजांची मूर्ती न काढण्याची भूमिका मराठी समाजाने घेतली. मात्र शुक्रवारी मध्यरात्री गावातील वीज पुरवठा बंद करुन मूर्ती हटवण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

तंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ते २५ ऑगस्टदरम्यान राबविण्यात येणार

‘नागरिकांच्या सहकार्याशिवाय ‘कोरोना’ संसर्गावर नियंत्रण मिळवता येणे शक्य नाही’

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना शुभेच्छा देताना अजितदादांनी व्यक्त केली ‘ही’ अपेक्षा