“हा पुतळा कोणाचा ? आहे माझाचंं मेणाचा !” – रामदास आठवले 

मुंबई : रामदास आठवले हे केवळ केंद्रियराज्यमंत्री नाहीत तर संघर्षातून पुढे आलेले लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. जे पोटात तेच ओठात असणारे ; बिनधास्त निर्भीड व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा देशात मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. त्यामुळेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी त्यांना केंद्रात स्थान दिले आहे. त्यांचे कर्तृत्व नेतृत्व मोठे आहे. समाजाला योग्य दिशा देणारे नेतृत्व असल्यानेच केंद्र सरकारमध्ये आता आहे त्या पेक्षा मोठे स्थान ना रामदास आठवलेंना निश्चित मिळणार आहे असे सांगत आठवलेंना केंद्रात कॅबिनेटमंत्रीपदाचा दर्जा देण्याची रिपाइंची अपेक्षा पूर्ण होणार असल्याचे आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवलेंच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी विचारमंचावर केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सीमाताई आठवले; कुमार जित आठवले ; सूनील्स वॅक्स म्युझियम चे प्रमुख सुनील कंडलूर आदि मान्यवर उपस्थित होते.

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण मुंबईत झाले आता हा पुतळा लोणावळ्यात सुनील्स वॅक्स म्युझियम मध्ये ठेवण्यात येईल . प्रधानमंत्री कार्यालयाच्या परवानगीनंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा पुतळा उभारण्यात येईल तसेच माझाही पुतळा उभारला जाईल अशी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंची ईच्छा असली तरी आमच्या पुतळ्यांची भेट होवो की न होवो मात्र आमची भेट ही नेहमी होत राहील असे मुख्यमंत्री म्हणाले.

कलाकाराने आठवलेंचा पुतळा इतका हुबेहूब बनविला की कोणता पुतळा आणि खरे आठवले कोणते हे ओळखता येणे अवघड झाले होते .तेंव्हा जो कविता बोलेल तेच आठवले ओळखायचे असे मिश्कीलपणे मिख्यमंत्री यावेळी म्हणाले आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाट आणि हास्याची कारंजी फुलली. लंडन च्या मॅडम तुस्सा म्युझियम ची मोनोपॉली सुनील कंडलूर यांनी तोडली असून त्याच धर्तीवर भारतात उत्कृष्ट मेणाचे पुतळे ते उभारत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कलाकार सुनील कंडलूर चे कौतुक केले.

“हा पुतळा कोणाचा? आहे माझाच मेणाचा !” अशी काव्यमय सुरुवात करीत माझ्या पुतळ्याचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झाले आता लवकरच मुख्यमंत्र्यांच्याही मेणाच्या पुतळ्याचे माझ्या हस्ते उदघाटन करू असे केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले म्हणाले. पालघर मध्ये भाजप चा उमेदवार शिवसेनेने पळविला आहे मात्र उमेदवार पळवापळवीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्रीसुद्धा हुशार आहेत. असे मिश्किलपणे म्हंटले. पालघरमध्ये त्यांनी जिंकून येईल असा उमेदवार दिला आहे.

महाराष्ट्राच्या समाजकारणाला आणि राजकारणाला सांधण्याचे उत्कृष्ट काम अभ्यासू असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे असे कौतुक ना रामदास आठवलेंनी मुख्यमंत्र्यांचे केले .
चांगला बनविला असल्याबद्दल सुनील कंडलूर चे कौतुक करून त्यांना नविमुंबईत वॅक्स म्युझियम साठी जमीन देण्यात यावी तसेच त्यांना पुढील वर्षी पद्मश्री किताब देऊन गौरविण्याची शिफारस ना रामदास आठवलेंनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली.