गडकरींचा पुतळा न्यायाच्याच प्रतीक्षेत,भाजपने दाखविलेल्या गाजरामुळे साहित्य विश्वात संताप 

Ram-Ganesh-Gadkari

पुणे : नाटककार राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्यावरुन पुन्हा वादंग माजण्याची शक्यता आहे. कारण संभाजी उद्यानात राम गणेश गडकरी यांचा पुतळा उभारण्याची मागणी ब्राह्मण महासंघाने केली आहे. 3 जानेवारी 2017 च्या मध्यरात्री संभाजी उद्यानातील गडकरींचा पुतळा तोडण्यात आला होता. या प्रकाराने महाराष्ट्रातील समाजमन ढवळून निघाल्यानंतर थेट पंतप्रधान कार्यालयाने प्रकाराची नोंद घेतली. पण, राज्य सरकार आणि पालिका प्रशासन यांच्या पातळीवर कार्यवाही झालेली नाही.

काल पुण्यात संभाजी उद्यानात राम गणेश गडकरी यांच्या तोडलेल्या पुतळ्यावरुन ब्राह्मण महासंघ पुन्हा अक्रमक झाला आहे. पुणे महानगरपालिकेच्या आश्वासनची आठवण करुन देण्यासाठी तोडलेल्या स्मारकाची निषेधात्मक पूजा करण्यात आली. पुतळ्याच्या वादग्रस्त जागेत प्रशासनानं मनाई केल्यानं संरक्षक कुंपणाला पुष्पहार अर्पण करुन पूजा केली. गडकरी यांच्या पुण्यतिथी निमित्तानं ब्राह्मण महासंघानं पूजा करुन मनपा प्रशासनाचा निषेध केला.

Loading...

सत्तेत आल्यास सन्मानाने पुतळा बसवू, असे आश्वासन देणाऱ्या भारतीय जनता पक्षाला याचा विसर पडला असल्याची टीका आता साहित्य विश्वातून होऊ लागली आहे. राम गणेश गडकरी यांची बुधवारी स्मृतिशताब्दी साजरी होत असताना, त्यांच्या पुतळ्याचे काय, असा सवाल विचारला जात आहे. विशेष म्हणजे त्यावेळीच गडकरींचा पुतळा पुन्हा सन्मानाने बसविण्याचा एकमुखाने प्रस्ताव महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आला होता मात्र केवळ राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे गडकरी अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.

दरम्यान,‘राजसंन्यासी’ नाटकातून राम गणेश गडकरी यांना छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप आहे. पुतळा हटविल्यानंतर पुण्यातील साहित्य व नाट्य क्षेत्रात असंतोष आहे. अनेक संस्था,साहित्य रसिक, संघटनांनी या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

पुण्यातील जंगली महाराज रोडवर महापालिकेचे संभाजी उद्यान आहे. या उद्यानात राम गणेश गडकरींचा पुतळा होता. आचार्य अत्रे यांच्या हस्ते २३ जानेवारी १९६२मध्ये या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेला हा पुतळा राम गणेश गडकरी स्मारक समितीने पुणे महापालिकेला भेट दिला होता. ‘राजसंन्यास’ या नाटकातून राम गणेश गडकरींनी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप करत नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुण्याच्या संभाजी उद्यानातील पुतळा तोडफोड करत हटवण्यात आला होता.

या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी चार तरुणांविरुद्ध चोरी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक देखील करण्यात आली होती. प्रदीप भानुदास कणसे (वय २५, रा. नऱ्हे आंबेगाव), हर्षवर्धन महादेव मगदूम (२३, रा. बालाजीनगर), स्वप्निल सूर्यकांत काळे (२४, रा. वडमुखवाडी, चऱ्होली, आळंदी), गणेश देवीदास कारले (२६, रा. चांदुस, ता. खेड) अशी आरोपींची नावे आहेत. हातामध्ये कुऱ्हाड आणि हातोडे घेतलेले चार तरुण मध्यरात्री १.५० वाजता उद्यानामध्ये घुसले. त्यांनी पुतळ्यावर कुऱ्हाड आणि हातोड्याने घाव घातले. हा पुतळा खाली पाडल्यानंतर दोघांनी उचलून उद्यानाच्या पाठीमागूनच वाहात असलेल्या मुठेच्या पात्रामध्ये नेऊन टाकला. हा सर्व प्रकार अगदी दोन मिनिटांत आटोपला. त्यानंतर, पसार झालेल्या कार्यकर्त्यांनी पहाटेच्या सुमारास हा पुतळा नदीत टाकून दिला.

पुतळा पडल्यानंतरच्या त्यावेळच्या प्रतिक्रिया
पुरोगामी महाराष्ट्रात घडलेली ही घटना काळीमा फासणारी आहे.या घटनेचा मी निषेध करतो- अजित पवार(माजी उपमुख्यमंत्री )

राम गणेश गडकरींचा पुतळा हटवण्याची घटना निंदनीय आहे.याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत- पालकमंत्री गिरीष बापट

राम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा उभा करु.मतांचं राजकारण करायचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही- प्रशांत जगताप (तत्कालीन महापौर, पुणे)

पुतळा हटवला तरी गडकरी अजरामर राहतील : सामना

मराठा समाज सर्व समाजाचं पालकत्व घेणारा समाज आहे.त्यामुळे शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांच्या नावानं असं करणं,हे त्यांना लहान केल्यासारखं आहे-शिवसंग्राम संघटनेचे नेते आमदार विनायक मेटे

संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरींचा पुतळा हटवण्यात संभाजी ब्रिगेडचा काहीही संबंध नाही.ज्या मर्द मराठ्यांनी केलं त्यांना सलाम !- नितेश राणे, आमदार काँग्रेस

गडकरींचा पुतळा बसवेपर्यंत पुण्यात प्रयोग नाही : पुष्कर श्रोत्री (अभिनेता)

राम गणेश गडकरी यांचा परिचय
राम गणेश गडकरी (मे २६, इ.स. १८८५; नवसारी, गुजरात – जानेवारी २३, इ.स. १९१९; सावनेर)राम गणेश गडकरी यांना महाराष्ट्राचा ’शेक्सपियर’ समजले जाते. ते मराठी कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक होते. गोविंदाग्रज ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या, आणि बाळकराम ह्या टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले. ह्या साहित्याच्या जोडीला ‘एकच प्याला’, ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’, आणि ‘भावबंधन’ ही चार पूर्ण नाटके (आणि ‘राजसंन्यास’ आणि ‘वेड्यांचा बाजार’ ही दोन अपुरी राहिलेली नाटके) लिहून गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.विविध नाट्यप्रेमी संस्थांनी, राम गणेश गडकरी यांच्या आणि त्यांची पत्नी रमाबाई यांच्या नावाने नाटककारांसाठी आणि नाट्याभिनयासाठी अनेक गडकरी पुरस्कार ठेवले आहेत.

पुण्यातील जंगली महाराज रोडवर महापालिकेचं संभाजी उद्यान आहे. या उद्यानात राम गणेश गडकरींचा पुतळा होता. 23 जानेवारी 1962 मध्ये आचार्य अत्रे यांच्या हस्ते संभाजी उद्यानात राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. पण 1962 साली बसवलेला पुतळा इतक्या वर्षांनी का हटवला असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
'हिंसक वळण लावणारे, तोडफोड करणारे कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीचे नाहीत'
...तर भाजप - मनसे एकत्र येऊ शकतात; पाटलांनी दिले युतीचे संकेत
'एमआयएम'ने आजपर्यंत सगळ्यांनाच शिंगावर घेतलयं, मनसेला घाबरत नाही
मनसेच्या संघटना बांधणीची जबाबदारी बारामतीकराच्या खांद्यावर
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
पुन्हा मोदी सरकार येणार व मी पुन्हा मंत्री होणार : रामदास आठवले
सावधान : मुंबई आणि पुण्यातही आढळले‘कोरोना'चे संशयित रुग्ण