fbpx

राज्याचा अर्थसंकल्प आज जाहीर होणार, शेतकऱ्यांसाठी आणि औद्यगिक क्षेत्रासाठी विशेष तरतूद अपेक्षित

टीम महाराष्ट्र देशा : राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सोमवारी जाहीर झाला. तर आज राज्याचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. हा फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांडल्या जाणाऱ्या या अर्थसंकल्पात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आणि औद्यगिक क्षेत्रासाठी काही विशेष तरतुद असणार का? याकडे राज्याचे लक्ष असणार आहे.

राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार राज्याची अर्थव्यवस्था देशाच्या ६.८ टक्के विकास दरापेक्षा अधिक वेगाने म्हणजे ७.५ टक्के दराने विकासाच्या पायऱ्या चढत आहे. राज्याने मागील चार वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊनही अपेक्षित यश मिळवले आहे, अशी महिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

राज्याचा अर्थसंकल्प आज दुपारी सादर होणार असून विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार दुपारी अर्थसंकल्प सादर करतील. तर विधानपरिषदेत राज्यमंत्री दिपक केसरकर अर्थसंकल्प मांडणार आहेत.