रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर राज्यात चित्रनगरी विकसित करणार – विनोद तावडे

मुंबई  : चित्रपटांच्या चित्रिकरणासाठी कलाकारांना परदेशात जाण्याची आवश्यकता भासू नये म्हणून राज्यात रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर चित्रनगरी विकसित करण्यात येईल, असे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी येथे सांगितले.

पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सामाजिक संस्थांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

Loading...

यावेळी दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालिका जयश्री भोज, सहव्यवस्थापकीय संचालक निवृत्ती मराळे, धर्मदाय उपायुक्त भरत व्यास तसेच चित्रपट क्षेत्रातील संबधित व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या चित्रनगरीमुळे पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे. ग्रामीण भागातील होतकरु तरुणांमधून भावी पिढीतील दिग्दर्शक, गायक, गीतकार घडविण्यासाठी महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामाची निर्मिती करण्यात येणार आहे, असेही श्री. तावडे यावेळी म्हणाले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
उद्धवची आणि संज्याची औकात काढली त्याबद्दल उदयनराजेंच अभिनंदन:निलेश राणे
संज्या म्हणजे लुक्का;संज्या राऊत म्हणजे 'पिसाळलेला कुत्रा':निलेश राणे
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
'अजित पवार हे सध्याच्या मंत्रिमंडळातील अत्यंत कार्यक्षम मंत्री असून ते  कामाला वाघ आहेत'
नितेश राणेंची जीभ घसरली संजय राऊतांवर केली अश्लाघ्य भाषेत टीका
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
'हा देश मोदी आणि अमित शाह यांच्या बापाचा नाही'
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का