‘राज्य सरकारचा गूण दहावी निकालाच्या वेबसाईटला लागला, दोन्हीही ठप्पच!’ भाजपचा टोला

uddhav

मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल आज शुक्रवारी, दि. १६ जुलै रोजी दुपारी १ वाजल्यापासून जाहीर झाला आहे. पण, निकालाच्या साइटवर ट्रॅफिक वाढल्याने साइट क्रॅश झाली आहे. त्यामुळे निकाल लागूनही तो दिसत नसल्याने विद्यार्थी आणि त्यांचे पालकही वैतागले आहेत.

याच मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला आहे. ‘राज्य सरकारचा गूण दहावी निकालाच्या वेबसाईटला लागला, दोन्हीही ठप्पच’ असा टोला त्यांनी लगावला आहे. ‘राज्यातील ठप्प आघाडी सरकारचा, जनतेला प्रतिसाद न देण्याचा ठाकरे सरकारचा गुण वेबसाईटला लागला का?’ असा सवाल केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं पत्रकार परीषद घेत दहावीचा निकाल आज जाहीर केला. दुपारी एक वाजता मुलांना निकाल कळणार होता. मात्र बोर्ड ने दिलेली साईट ओपन होत असल्याने निकाल मिळण्यास उशीर झाला. तब्बल तीन तास उलटूनही अद्याप निकाल मिळालेला नाही. त्यामुळे अनेक मुलांची निराशा झाली. बोर्डाकडून निकालासाठी दोन साईट देण्यात आल्या होत्या. मात्र या साईट क्रॅक झाल्यामुळे अद्यापही निकाल मिळालेला नाही. निकाल काय लागला हे न कळल्यानं पालकांमध्ये ही नाराज आहेत.

विभागनिहाय टक्केवारी
कोकण – १०० टक्के
पुणे- ९९.९६ टक्के
नागपूर – ९९.८४ टक्के
औरंगाबाद – ९९.९६ टक्के
मुंबई- ९९.९६ टक्के
कोल्हापूर -९९.९२ टक्के
अमरावती – ९९.९८ टक्के
नाशिक – ९९.९६ टक्के
लातूर – ९९.९६ टक्के

महत्वाच्या बातम्या