मुंबई – पुण्यात मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला त्या घटनेचा आम्ही निषेध करत असून संबंधितांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी राज्यसरकार प्रयत्न करेल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नवाब मलिक यांनी विरोधी पक्ष राज्यात मुली सुरक्षित नाहीत असे बोलून राजकारण करत आहे ते न करता आपल्या दिव्याखाली अंधार किती आहे हे पहावे असा टोला भाजपला लगावला आहे.जे भाजप राज्यसरकारवर आरोप लावतेय त्यांच्या खासदार, आमदारांनी व नेत्यांनी केलेले कुकर्म आठवावे. सेंगर, उन्नाव सारख्या व उत्तरप्रदेशमध्ये अशा अनेक घटना त्याकडे लक्ष द्यावे आणि मग अशाप्रकारचे आरोप करावे असा सल्लाही नवाब मलिक यांनी दिला आहे.
महाराष्ट्रात अशाप्रकारचे जो कुणी कुकर्म करेल त्याला सोडण्यात येणार नाही असा स्पष्ट इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे. दरम्यान संबंधित ११ लोकांना अटक झाली असून त्यांच्यावर लवकरात लवकर आरोपपत्र दाखल केले जाईल असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, पुण्यातल्या वानवडी येथील १४ वर्षीय लेकीवर अंगाचा थरकाप उडेल असा सामूहिक पाशवी अत्याचार झालाय. मुलीवर उपचार सुरु असून ती गंभीर आहे रिक्षाचालक तिला रिक्षातून नेतो काय पुढे ५-६ रिक्षा चालक पाशवी अत्याचार करतात २ रेल्वेचे कर्मचारीही त्यात सहभागी होतात..आरोपींना पुणे पोलिसांनी अटकही केलीय. राज्यात अत्याचारांची परिसीमा झालीये. एकीकडे गृहविभागाचा काडीचाही वचक न राहिलेल्या आणि दुसरीकडे मेहबूब सारखे बलात्कारी मोकाट वावरत असल्याने आम्ही ही असेचं बाहेर येऊन फिरू शकतोयं हे निर्ढावलेपणं विकृतांना आलंय हे नक्की असं म्हणत त्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- वानवडी बलात्कार प्रकरण : गृहविभागाचा राज्यात काडीचाही वचक राहिला नाही; चित्रा वाघ यांची टीका
- देशाला अग्रेसर करण्यासाठी सर्वांना सोबत प्रयत्न करावे लागतील – सरसंघचालक
- अण्णासाहेब पाटील महामंडळाला तातडीने १०० कोटी रुपये द्या; नरेंद्र पाटील यांची मागणी
- ‘मोहन भागवत यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणाले..’
- ईडीने हस्तक्षेप करणं एका अर्थानं राज्यांच्या अधिकारांवर गदा आणणं; शरद पवारांची टीका