ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार; फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

fadanvis

मुंबई : राज्यात सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. भाजपने ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर महाविकास आघाडी सरकारला सळो कि पळो केले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. आज भाजपने राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून अनेक ठिकाणी आंदोलने देखील करण्यात आली आहेत.

दरम्यान आता विरोधकांचा हा रोष पाहता ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकारनं एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे. ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढण्यात येणार आहे. तशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा सरकार प्रमाणे अध्यादेश काढला आहे. आरक्षणासाठी 50 टक्क्यांची मर्यादा ठेवली आहे. त्या प्रमाणे राज्यात आपण अध्यादेश काढणार आहोत, असं भुजबळ यांनी सांगितले आहे.

यावर आता माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या अध्यादेशाच्या निर्णयाचं फडणवीसांनी स्वागत केलं आहे. मात्र यावेळी त्यांनी खोचक टोला देखील राज्य सरकारला लगावला आहे. हे उशीरा सुचलेलं शहाणपण असल्याचं ते यावेळी म्हणाले.

मात्र असं असलं तरी केवळ अध्यायदेश काढून प्रश्न सुटणार नसून यासाठी पुरेशा निधीची गरज असल्याचं फडणवीस म्हणाले. हा निर्णय उशिरा घेण्यात आला असला तरी योग्यचं असल्याचं ते म्हणाले. राज्य मागासवर्ग आयोगाकडून अहवालही घ्यावा’ अशी सूचना देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या