राज्यसरकार कडून खुशखबर 1 जानेवारीपासून शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

टीम महाराष्ट्र देशा : राज्य सरकारमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राज्यसरकार कडून खुशखबर. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 1 जानेवारीपासून सातव्या वेतन आयोगानुसार वेतनलाभ देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यासाठी सरकारने के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. 2017 मधील थकित महागाई भत्त्यासह हे वेतन देण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली.

मुख्यमंत्री म्हणाले, राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना (1 जानेवारी 2016) सातवा वेतन आयोग लागू केला जाईल. पण सहाव्या वेतन आयोगात अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनात त्रुटी राहिल्या आहेत. के. पी. बक्षी त्या त्रुटींसंदर्भात सुनावणी घेण्याचे काम या समितीला कराव लागेल. हे काम आंतिम टप्प्यात असून, लवकरच अहवाल सादर करू असे समितीने सांगितले आहे. त्यानंतर निर्धारित वेळेपासून सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

 

You might also like
Comments
Loading...