मोदींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार सदैव प्रयत्नशील : मुख्यमंत्री फडणवीस

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहनिर्माण व बांधकाम क्षेत्राशी निगडीत विविध विषयांसंदर्भात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मुंबईतील गृहनिर्माण आणि बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्याबाबत चर्चा झाली.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्य सरकार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘सर्वांसाठी घरे आणि परवडतील अशी घरे’ हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, मुंबईतील गृहनिर्माण आणि बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील आहे. या क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्यांवर निश्चितच ठोस उपाय शोधले जातील. यात त्यासाठी केंद्रीय मंत्री आणि केंद्र शासनाकडून मिळणारे सहकार्य महत्त्वाचे आहे.

दरम्यान या बैठकीला वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आदी नेते उपस्थित होते.