राज्य सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना भरघोस मदत करावी : देवेंद्र फडणवीस

devendra fadanvis

मुंबई : गेल्या तीन दिवसांमध्ये मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी जवळपास ९ जिल्ह्यामध्ये प्रवास केला.त्या ठिकाणची एकूण परिस्थिती अत्यंत भीषण आहे. कापूस, सोयाबीन, ऊस, कांदा यासह जवळजवळ सर्व पीक शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत.बऱ्याच ठिकाणी जमीन खरवडून गेली आहे. माती वाहून आणून शेतकऱ्यांना जमीन तयार करावी लागेल, असे मत भाजप नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांकडे वस्तूस्थिती पोहोचली नाही. आम्ही गेलेल्या ठिकाणी पंचनामे झाले नसल्याची तक्रार आहे. ८० ते ९० टक्के पंचनामे झाले हे सांगणे योग्य नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

राज्य सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना भरघोस मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली. केंद्र सरकारकडे बोट दाखवणे बंद केले पाहिजे. राज्याने कर्ज काढून शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, असंही ते म्हणाले

अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी आहे. पुढच्या पिकाकरिता जमीन तयार करायची हे मोठे आव्हान आहे. महाबीजचं बियाण बोगस निघालं. तिबार पेरणी केल्यांनंतरही अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाती काही मिळणार नाही, कृषीपंप वाहून गेले आहेत. शेतकऱ्यांमध्ये मोठा आक्रोश आहे, असेही फडणवीसांनी म्हटले.

सध्या विम्या कंपन्या दाद प्रशासनाला दाद देत नाहीत. विम्यासाठी ऑनलाइन लॉगिन करणं शेतकऱ्यांना कठीण जात आहे. नवीन सिस्टीम अवघड झाली आहे. ऑफलाईन विमा क्लेम अर्ज स्वीकारावेत आणि मान्य करावेत आणि शासकीय पंचनामे मदतीसाठी ग्राह्य धारावेत, अन्यथा विमा क्लेम शेतकऱ्यांना मिळणार नाही. ज्यांनी विमा काढला नाही त्यांना रकमेच्या पन्नास टक्के मदत दिली पाहिजे.असंही फडणविसांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या