राज्यातील सरकार स्थिर, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत; जयंत पाटलांचे स्पष्टीकरण

राज्यातील सरकार स्थिर, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत; जयंत पाटलांचे स्पष्टीकरण

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे यांनी असं काही वक्तव्य केलं की ज्यामुळे शिवसेना–भाजपची पुन्हा युती होणार असल्याची जोरदार चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे हे मंचावर असताना त्यांच्याकडे पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याच्या संदर्भात वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगत आहेत.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात व्यासपीठावरच्या उपस्थित मान्यवरांना संबोधताना आजी-माजी सहकारी असा उल्लेख केला आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी असे म्हणतांना त्यांनी मागे वळून पहिले. या वक्तव्यानेच भविष्यात पुन्हा एकदा सेना-भाजप युती होणार का? असे संकेत मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले आहेत. यावरून आता राजकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्यातील सरकार स्थिर असून आमच्यात कोणतेही मदभेद किंवा अडचणी नाहीत. कोणाचीही तक्रार नाही. त्यामुळे इतर कोणतेही प्रश्न उद्भवत नसल्याचे सांगत शिवसेना-भाजप एकत्र येण्याच्या चर्चेवर जयंत पाटील यांनी पूर्णविराम दिला आहे. भाजप नेते दोन वर्षांचा कालावधी सांगत असून त्यांच्या शब्दावर कोण विश्वास ठेवणार?, असा सवालही त्यांनी केला यावेळी आहे.

महत्त्वाच्या बातम्या