राज्य सरकारने बीड रेल्वेसाठी वितरित केला ६३ कोटी रुपयांचा निधी

टीम महाराष्ट्र देशा : भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार डॉ.प्रितम मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे राज्य सरकारने अहमदनगर-बीड-परळी नवीन रेल्वे मार्गासाठी ६३ कोटी रुपयांचा निधी वितरित केला. यासंदर्भातील आदेश गृह विभागाने रविवारी काढले आहेत. दरम्यान, राज्य शासनाने या मार्गाकरिता ३१ मार्च २०१९ अखेर ९८६ कोटी ८४ लाख इतका निधी रेल्वे विभागाला उपलब्ध करून दिला आहे.

अहमदनगर-बीड-परळी या नवीन रेल्वे मार्गाकरिता २ हजार ८२६ कोटी एवढा खर्च अंदाजित आहे, उक्त खर्चापैकी एक हजार ४१३ कोटी एवढा पन्नास टक्के हिस्सा राज्य शासनाकडून केंद्रीय रेल्वे बोर्डास उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या स्तरावर घेतलेला होता. त्यानुसार सदर रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने ३१ मार्च २०१९ पर्यंत ९८६ कोटी ८४ लाख रुपये इतका निधी रेल्वेस उपलब्ध करून दिला असून रेल्वेस २०१९ – २० या आर्थिक वर्षात १२० कोटी रूपये उपलब्ध करून देण्याचे ठरले आहेत.

Loading...

या प्रकल्पासाठी रेल्वे विभागाने ३१ मार्च २०१९ पर्यंत एक हजार १६९ कोटी एवढा निधी खर्च केला असून सन २०१९ – २० साठी २५० कोटी रूपये इतकी तरतूद केली आहे. राज्य सरकारने हिश्याचे समप्रमाण राखण्यासाठी सन २०१९-२० करिता मागणी केलेल्या रक्कमेपैकी ६३ कोटी रूपये रेल्वे विभागाला वितरित केले आहेत, तसा शासन आदेश गृह विभागाने २० जानेवारी रोजी काढला आहे.

समस्त जिल्हा वासियांच्या वतीने लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी विडा उचलला होता, बीडला रेल्वे यावी हे त्यांचे स्वप्न त्यांच्या पश्चात पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे यांनी प्रत्यक्षात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले व ते अजूनही सुरूच आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला. तसेच राज्यानेही त्यांचा हिस्सा दिला. पंकजा मुंडे व प्रितम मुंडे यांनी वेळोवेळी संबंधित अधिका-यांच्या बैठका घेऊन सूचना केल्या, या सर्वांचा परिपाक म्हणून लवकरच हा मार्ग पुर्णत्वास येण्याकडे वाटचाल सुरू आहे. दरम्यान, निधी वितरित केल्याबद्दल पंकजा व प्रितम मुंडे यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'