दुष्काळी महाराष्ट्राला केंद्र सरकारचा दिलासा, राज्याला आणखी एकदा दुष्काळ निधी मंजूर

टीम महाराष्ट्र देशा : दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्राला केंद्र सरकार कडून आणखी एखदा दुष्काळ निधी मंजूर झाला आहे. केंद्राकडून २१६० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे महारष्ट्रातल्या दुष्काळी जनतेला काहीसा दिलासा मिळणार आहे.केंद्राकडून एकूण ४२४८.५९ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारला मिळाला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटर वरून ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.

महाराष्ट्रला यंदा भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. तर दुष्काळामुळे हाताला रोजगार नसल्याने गावच्या गाव स्थलांतरीत होत आहेत. अशी सर्व विदारक परिस्थिती असताना केंद्राने राज्याला दुष्काळ निधी मंजूर केला आहे. याधी देखील जवळपास २१०० कोटी रुपयांचा निधी केंद्राने राज्याला दिला होता. तर आता दुष्काळी उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारच्या विनंतीला मान देऊन केंद्राने महाराष्ट्र सरकारला आणखी २१६० कोटी रुपयांचा मदतनिधी दिला आहे.