नितीन गडकरी यांच्या नावापुढे रिजेक्टेड असे शिक्के

टीम महाराष्ट्र देशा : लोकशाहीच्या कुंभमेळ्याला आज सुरुवात झाली आहे, लोकसभेसाठी पहिल्या टप्यातील मतदान सध्या पार पडते आहे. विदर्भातील ७ जागांसह देशभरातील ९१ मतदारसंघात मतदान होत आहे. नागरिकांकडून मतदानाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तर दुसरीकडे नागपुरात धक्कादायक प्रकार घडला आहे.नागपुरातील न्यू इंग्लिश स्कूलमधल्या मतदान केंद्रावर भाजप उमेदवार नितीन गडकरी यांच्या नावापुढे रिजेक्टेड असे शिक्के मारण्यात आले आहेत.

मतदारांना उमेदवारांची माहिती व्हावी यासाठी मतदान केंद्रा बाहेर यादी लावली जाते. त्या यादीवर भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या नावापुढे रिजेक्टेड असे शिक्के मारण्यात आले आहेत.हे शिक्के कोणी मारले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान नागपूर लोकसभा मतदार संघात एकेकाळचे दोन सहकारी आमने सामने आले आहेत. त्यामुळे या लढतीमध्ये वेगळीच रंगत पहिला मिळणार आहे. युतीकडून भाजपचे उमेदवार नितीन गडकरी रिंगणात आहे तर त्यांना टक्कर देण्यासाठी आघाडीने नाना पटोले यांना रिंगणात उतरवल आहे. त्यामुळे कधीकाळी एकाच पक्षाचं कार्य करणारे नेते आज एकमेकांविरोधात लढत आहेत.