आदल्या दिवशी लावली वेगमर्यादा, दुसऱ्या दिवशी भरधाव वाहनाने महिलेला चिरडले

ACCIDENT

औरंगाबाद : दोन दिवसापुर्वीच शहर वाहतूक शाखेने शहरातील अपघात थांबावे यासाठी नविन वाहतूक नियम जाहीर केले. पण नियम जाहीर केल्यानंतर अवघ्या ४८ तासातच एका अपघाताची घटना घडली. एका भरधाव अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या एका महिलेला जोरधार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री आकाशवाणी चौकात घडली. नवीन वाहतूक नियमानुसार वेगमर्यादा ४० किमी करण्यात आली आहे.

कडूबाई बाबूराव खंडागळे असे या महिलेचे नाव आहे. कडुबाई खंडागळे या इंदिरानगर येथे राहतात. मोलमजुरीचे काम करुन त्या आपला उदरनिर्वाह भागवतात. शनिवारी रात्री नऊ वाजता त्या भंगार वेचण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकात रस्ता ओलांडत आसताना एक भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेने कडूबाई यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघात झाल्यानंतर परिसरातील आकाशवाणीमधील सुरक्षा रक्षक बाहेर आला. कडूबाई या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. सुरक्षा रक्षकाने तत्काळ जवाहरनगर पोलिस ठाण्याला अपघाताविषयी माहिती दिली. काही वेळातच पोलिसांचे एक पथक तेथे दाखल झाले. यानंतर कडूबाईला घाटीत उपचारासाठी दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

महत्वाच्या बातम्या