धुळे जिल्हा परिषद विजयामागील सूत्रधार…

प्रफुल्ल पाटील

धुळे जिल्हा कधीकाळी दुधातूपाचा जिल्हा म्हणून ओळख असणारा,आदिवासी बहुल असा जिल्हा .१९९८ साली या जिल्ह्याचे विभाजन झाले आणि धुळ्यातून फुटून नंदुरबार या एका नवीन आदिवासी बहुल जिल्ह्याची निर्मिती झाली.या सगळ्यातून धुळ्याची भौगोलिक परिस्थिती बदलली असली तरी त्यातून आणखी एक नवीन ओळख जिल्ह्याला मिळाली ती म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्यात कमी तालुके असणारा जिल्हा(साक्री,धुळे,शिरपूर आणि शिंदखेडा हे चारच तालुके धुळ्यात) आहेत.

Loading...

नुकतीच धुळे जिल्हा परिषद निवडणूकीसोबत या चारही तालुक्यात पंचायत समित्यांची निवणूक पार पडली आणि यात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जिल्हा परिषदेत काँग्रेस चा सपशेल पराभव झाला.
आणि स्पष्टपणे भाजपच्या ताब्यात ही जिल्हा परिषद गेली आहे.आणि पंचायत सामित्यांबाबतीत बोलायचे झाले तर तीन पंचायत समित्या यात शिरपूर,शिंदखेडा आणि धुळे या ठिकाणी भाजपचा सभापती झाला तर फक्त साक्री पंचायत समितीवर महविकास आघाडीचा झेंडा फडकला.या सगळ्याची कारण मीमांसा आज काँग्रेसने आणि त्यांच्या समविचारी पक्षांनी करणे गरजेचे आहे.कारण महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्यासोबत सत्तापक्षात काँग्रेस आहे.पण अजूनही पराभूत मानसिकतेतून काँग्रेस आणि मित्र पक्ष बाहेर पडलेले नाही,असेच सध्य परिस्थितीवरून दिसते आहे.हे पक्षाच्या दृष्टीने कधीच हितावह नाही.

धुळ्यात विचार केला तर धुळे ग्रामीण हा भाग पूर्वापार रोहिदास पाटील यांच्या मागे म्हणजेच काँग्रेसच्या मागे आहे.पण जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये धुळे ग्रामीण मात्र नेहमी माजी आमदार दत्तू वामन पाटील यांच्या विचाराने प्रभावित झालेला दिसतो.या सगळ्यात लक्षणीय गोष्ट म्हणजे भाजपाने रित्या जोरदार मुसंडी मारत आपले स्थान बळकट केले आहे.
धुळ्यात तसे दोन गट आहेत पहिला काँग्रेस पक्ष आणि पक्षाची विचारसरणी मानणारा ज्याला ‘जवाहर गट’ या नावाने ओळखले जाते.या गटात रोहिदास पाटील आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा समावेश होतो.

त्याचबरोबर दुसरा गट आहे ‘अँकर गट’ ज्यात प्रामुख्याने रोहिदास पाटील यांच्या विरोधकांचा समावेश होतो. त्यात सध्या शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ची लोकं आहेत. याला पूर्ण पाठबळ हे अमरिशभाई पटेल यांचं आहे.धुळे जिल्हा परिषदेत एकूण ५६ जागा आहेत त्यात भाजपला या निवडणुकीत तब्बल ३९ जागा मिळाल्या तर शिवसेनेला ४,राष्ट्रवादीला ३,काँग्रेसला ७ आणि इतर ३ यात भाजपाच्या जागा वाढण्याचे कारण म्हणजे भाजप मध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणावर इंकमिंग सुरू झालं.(चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं असलं तरी धुळ्यात बाकी इनकमिंग ने भाजपला मोठा फायदाच झाला) त्यात प्रामुख्याने अमरिशभाई पटेल,शिरपुरचे माजी आमदार काशिराम पावरा,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांचा समावेश आहे.त्याचबरोबर खासदार सुभाष भामरे,माजी मंत्री जयकुमार रावल यांचाही भाजपकडे एक गट होताच.

भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या त्या साक्री तालुक्यात शिवाजीराव दहिते अजूनही आपला राजकीय दबदबा कायम ठेऊन आहेत हे त्यांनी सिद्ध केलंय त्याचबरोबर त्यांचा जनाधार ही वाढला आहे.हे त्यांनी निजामपूर गटातून आपल्या मुलाला विजयी करून दाखवून दिले आहे.एकंदरीत जिल्हा परिषद विजयाची रणनीती आखण्यात व्यस्त असणाऱ्या दहितेंना पंचायत समिती निवड सहज आणि सोपी वाटली असावी परिणामी तेथे मात्र पराभव पत्करावा लागला.पण मात्र विधानसभा निवडणुकीनंतर दाहिते संपले या विधानाला दहितेंनी शह दिला आहे.

कॉंग्रेस आणि समविचारी पक्षांनीही आपल्या परीने खूप चांगले प्रयत्न केले पण जनतेला ते आपली मते पटवून देऊ शकले नाही. त्यामुळे धनंजय मुंडे,अनिल गोटे यांनी जी प्रयत्नाची पराकाष्ठा केली ती फुकट गेली असं आपण म्हणू शकतो.त्यांच्या कार्यक्रमाला होणारी गर्दी ही मतात परिवर्तीत होऊ शकली नाही.त्यामुळे आपण चुकतोय कुठे यावर आत्ममंथन त्यांनी करणे गरजेचे आहे.
या विजयावर भाजपने मिरवून घेण्यासारखे असे खूप कमावले आहे असे नाही, तर हा विजय बाहेरून आलेल्या लोकांमुळे आला आहे.त्यामुळे हा विजय भाजपचा नसून एका अर्थाने बाहेरच्या पण नंतर भाजपवासीय झालेल्या लोकांनी मिळवून दिला आहे.

त्यामुळे शेवटी एकच सांगावं वाटते की विजय पक्षाचा नसून बाहेरून आलेल्या लोकांनी मिळवून दिला आहे.या वरून एकच सिद्ध होते की जिल्ह्यात प्रत्येक पक्षाला आपली पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर द्यावा लागेल.अन्यथा जनमताचे वारे पाहून किंवा राजकीय परिस्थिती पाहून आपली पक्ष निष्ठा सोडायला कधीही तयार असणारे लोकं आहेतच.हीच लोकं पुढे इतर पक्षातही दिसतील.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
...तर 'नितेश राणे' करणार मुख्यमंत्री 'उद्धव ठाकरें'चा सत्कार