पुणे शहरातील स्मार्ट सिटी योजना यशस्वी- मुख्यमंत्री

मुंबई, दि. 7 : पुणे शहरातील स्मार्ट सिटी योजना यशस्वी होत असून या अंतर्गत विविध प्रकल्पाचे कामे सुरु आहेत. नियोजित वेळेत ते पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली.
पुणे शहरातील स्मार्ट सिटी योजनेतील प्रकल्प सुरु करण्याबाबतचा प्रश्न सदस्य अनंत गाडगीळ यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले, पुणे शहरातील स्मार्ट सिटी योजनेत 60  प्रकल्प आहेत. त्याची किंमत रु. 4701 कोटी आहे. या प्रकल्पातील 10 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. 24 प्रकल्पांची वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. चार प्रकल्पाचे टेंडरिंग झाले आहे. 22 प्रकल्प सविस्तर प्रकल्प अहवाल स्टेजवर आहेत. यामध्ये सर्व प्रकारचे प्रकल्प आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या मागणीप्रमाणे पैसे देण्यात येत आहे. यातील काही प्रकल्प 2019 पर्यंत पूर्ण होतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
स्मार्ट सिटीमध्ये कचरा डंपिंग करण्यासाठी नव्हे तर कचऱ्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी जागा देण्यात आली आहे. या जागेवर काम सुद्धा सुरु झाले आहे, असे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी या चर्चेतील उप प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

या चर्चेत सदस्य शरद रणपिसे यांनी सहभाग घेतला.

2 Comments

Click here to post a commentLoading…
Loading...