दिल्ली उत्तरप्रदेशपेक्षा महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी नाही; डोंबिवली अत्याचारावर मनसे आक्रमक

shalini thackrey

मुंबई : मुंबईतील साकीनाका बलात्काराच्या घटनेनं देश हादरला असताना पुन्हा एकदा डोंबिवलीत सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ३० जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर गँगरेप प्रकरणात तब्बल 31 जण आरोपी असल्याची माहिती आहे.

यापैकी 22 जणांना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अल्पवयीन मुलीच्या प्रियकराने जानेवारीमध्ये बलात्कार करत व्हिडीओ काढला होता. या व्हिडीओच्या आधारे ब्लॅकमेल करत आरोपींनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. डोंबिवलीतील भोपर परिसरात हा प्रकार घडला. बुधवारी हा सगळा प्रकार उघडकीस आला असून मानपाडा पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

दरम्यान आता महाराष्ट्रात वारंवार होत असलेल्या महिलांवरील अत्याचारावरून मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी संताप व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘डोंबिवलीमधील सामूहिक बलात्काराची घटना अंगावर काटा आणणारी आहे. दिल्ली युपीपेक्षा महाराष्ट्राची स्थिती वेगळी नाही हे सिद्ध होण्यासाठी मुख्यमंत्र्यांना अजून काय घडणं अपेक्षित आहे?’ असा सवाल करत शालिनी ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या