निर्बंध लावूनही औरंगाबादेत परिस्थिती ‘जैसे थे’! संचारबंदीतही ‘इतक्या’ रुग्णांची वाढ

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभर १५ एप्रिल पासून ते १ मे दरम्यान कडक निर्बंध लावण्यात आले. त्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बंद ठेवण्यात आले. असे असतांनाही औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा पाहिला तर कडक निर्बंध नसतांनाचे पंधरा दिवस आणि निर्बंध काळातील पंधरा दिवस परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. याशिवाय कोरोनामुळे मृत्यू होण्याची संख्या देखील वाढली आहे यामुळे काळजी घेण्याची गरज आहेच. शिवाय निर्बंधांचा विशेष फायदा झालेला दिसत नाही.

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा काल रात्री आलेल्या अहवालानुसार १ लाख २६ हजार १७६ वर गेला आहे. त्यामुळे चिंता आणखी वाढत चालली आहे. जिल्ह्यातील १ एप्रिल पर्यत कोरोनाच्या रुग्णांचा अहवाल पाहिला तर १ एप्रिलपर्यत जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा हा ८४ हजार १६० वर होता. तर त्यात १ ते काल १ मे या ३१ दिवसांत तब्बल ४१ हजार १८१ रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या १ लाख २६ हजार १७६ वर जाऊन पोहोचली. त्यामुळे चिंता आणखी वाढली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाचा एकूण आकडा १ एप्रिल पर्यत ८४ हजार १६० वर होता. त्यानंतर १५ एप्रिलपर्यत या पंधरा दिवसांत २० हजार ४२३ रुग्णांची नव्याने भर पडली. आणि जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा हा १ लाख ४ हजार ५८३ वर जाऊन पोहोचला. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातही १५ एप्रिल ते १ मे दरम्यान कडक निर्बंध लावण्यात आले. केवळ सकाळी ७ ते ११ यावेळेत अत्यावश्यक सेवा देणारे दुकाने खुले ठेवण्यात आले.

त्यानंतर संपूर्ण बंद ठेवण्यात आले. असे असताना जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा पाहिला तर परिस्थिती जैसे थेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. १५ एप्रिल ला जिल्ह्यातील एकूण संख्या १ लाख ४ हजार ८३ एवढी होती. त्यात १५ एप्रिल ते १ मे दरम्यान २० हजार ७५८ रुग्णांची भर पडली. यावरून निर्बंध नसताना १ ते १५ एप्रिल दरम्यान २० हजारांहून अधिक रुग्णांची भर पडली होती. त्यात १५ एप्रिल ते १ मे दरम्यान कडक निर्बंध असतानाही जिल्ह्यात २० हजारांहून अधिक रुग्णांचीच भर पडली आहे. यावरून निर्बंध लावूनही परिस्थिती जैसे थे असल्याचे स्पष्ट होते. आता पुन्हा निर्बंध १५ दिवस वाढविण्यात आले आहे त्यामुळे आता तरी काळजी घ्यायला हवी.

महत्त्वाच्या बातम्या