आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे पाप भाजपला लागल्याशिवाय राहणार नाही- राजू शेट्टी

सांगली: राज्यात अजूनही शेतकऱ्यांची कर्जमाफी योग्यप्रकारे झाली नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करत आहेत. असा आरोप खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. त्यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे पाप भाजपला लागल्याशिवाय राहणार नाही. असे बोलत खासदार राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले.

लोकसभेच अधिवेशन चालू दिले नाही म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका दिवसाचा उपोषण केले. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मे किंवा जून मध्ये एका आठवडयाच अधिवेशन बोलवण्याची मागणी राष्ट्रपतीकडे करणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितले.

राजू शेट्टी म्हणाले, आश्वासन आणि घोषणा यापलीकडे शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. कर्जमाफी जाहीर करून एक वर्ष झाले. आता या एका वर्षाचे व्याज कोणी द्यायचे ? असा प्रश्न राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.

You might also like
Comments
Loading...