औरंगाबाद: संकेत जायभायेच्या फरार मित्रांना पोलिसांनी घेतले ताब्यात

औरंगाबाद: प्रेमप्रकरणातून संकेत कुलकर्णी (१९, मूळ रा. पाथरी, परभणी) तरुणाचा भररस्त्यावर कारखाली चिरडून खून केल्याप्रकरणी कारचालक आरोपी संकेत प्रल्हाद जायभाये  (२३, रा जयभवानी नगर, औरंगाबाद) याचे मित्र उमर शेख पटेल (वय 22, रा. बीड बायपास परिसर) व विजय जोग यांना मुकुंदवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

विजय जोग याला पैठन मधून तर उमर शेख याला देवळाई मधून ताब्यात घेतले.  यांच्याकडून खून कट रचून केल्याचे पुरावे मिळण्याची शक्यता आहे.

एका मुलीवर एकतर्फी प्रेमातून  त्यांच्यात वाद  झाला आणि  २३ मार्च रोजी आरोपी संकेत जायभाये याने संकेत कुलकर्णीला भेटायला बोलवून  आपल्या कारने त्याच्या दुचाकीला उडवले. त्यात संकेत कुलकर्णी कारखाली चिरडला गेला. उपचारादरम्यान संकेतचा जीव गेला. या खून प्रकरणात मुख्य संशयित आरोपी संकेत जायभायेनंतर त्याच्या दोन मित्रांना मुकुंदवाडी पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले.  या दोघांवर गुन्ह्यात सहभागी झाल्याचा आरोप आहे दरम्यान, तिसरा संशयित  संकेत मचे अद्याप पसार आहे. ही कारवाई पोलिस निरक्षक प्रेमसिंग चंद्रमोरे  यांच्या पथकाने केली.