‘तुझ्या माझ्या संसाराला..’ इथे होतेय मालिकेचं शुटींग

hardik-joshi

मुंबई : छोटया पडद्यावरील ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’. अवघ्या काही भागांमध्येच ही मालिका लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेतील आदिती आणि सिद्धार्थप्रमाणेच मोठी बाई ही भूमिका प्रचंड गाजत असून अभिनेत्री अंजली जोशी यांनीही भूमिका साकारली आहे.

या मालिकेचं चित्रीकरण कुठे सुरु असं प्रेक्षकांच्या मनात नक्कीच प्रश्न असेल. याबद्दल अभिनेत्री अंजली जोशी म्हणाल्या ‘मालिकेत दाखवल्याप्रमाणे मी खऱ्या आयुष्यातदेखील मोठी घरात मोठी सून आहे. माझ्या लग्नानंतर वर्षभरातच घरात दोन धाकट्या जावा आला. त्यामुळे घरात सासू-सासरे, मी, नवरा, दोन दीर, दोन जावा असा मोठा परिवार आहे. आम्ही सगळे एकत्रच राहत होतो. या मालिकेप्रमाणेच माझ्या खऱ्या आयुष्यातही तितकंच प्रेमळ कुटुंब आहे. आमच्या सगळ्या जावांचं वय जवळपास सारखंच असल्यामुळे आमच्यात बॉण्डिंग चांगलं आहे, असं ही म्हणाल्या.

सध्या आमच्या मालिकेचं चित्रीकरण नाशिकमध्ये सुरु आहे. यात अनेक जण नाशिकच्या बाहेरुन आले आहेत. त्यामुळे आम्ही एकत्र राहतांना कोणालाही कुटुंबाची आठवण येणार नाही याची काळजी घेतो. आणि, एका कुटुंबासारखंच एकमेकांना सांभाळून गुण्यागोविंदाने राहतो’ असे नुकतचं शेअर केले आहे. या मालिकेत अभिनेता हार्दिक जोशी मुख्य भूमिकेत तर अमृता पवारने आदितीची भूमिका साकारली आहे.

महत्वाच्या बातम्या