शिवसेनेला मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा रोग झाला, मनसेचा घणाघात

मुंबई : पीकविमा कंपन्यांकडून राज्यातील शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. काही दिवसांपूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विम्याचे वाटप न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, आज उद्धव ठाकरे हे स्वतः रस्त्यावर उतरले तसेच मुंबईमध्ये पीक विम्या संदर्भात मोर्चा काढण्यात आला होता.

मनसेकडून शिवसेनेच्या आंदोलनाची खिल्ली उडविण्यात आली आहे. शिवसेनेला मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा रोग झाल्याची टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन शिवसेनेच्या आंदोलनाची खिल्ली उडवली आहे.

Loading...

तर शिवसेनेचा पीकविमा कंपनी विरोधातील मोर्चा म्हणजे नाटक असल्याची टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. ज्यांनी शेतकऱ्यांच्या पिकविम्याचे पैसे वेळेत आणि योग्य दिले पाहिजे, ते मोर्चा काढून जबाबदारी झटकत आहेत. भाजप-सेनेच्या सरकारने खासगी विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रडविले. शेतकरी बांधवच आता या मोर्चेकऱ्यांचा निषेध करतील. असा घणाघातही थोरात यांनी केला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
मनसेच्या झेंड्यावरून वाद,मराठा क्रांती मोर्चा करणार खटला दाखल
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
रोहितदादा पवार मानले राव या माणसाला ! मुंबईच्या डबेवाल्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी झाला ' एक दिवसाचा मुंबईचा डबेवाला '
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'