fbpx

धनगर समाजाच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभा राहील : ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा- शिवसेना जशी मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून आरक्षणाच्या मुद्द्यासाठी उभा राहिली तशीच शिवसेना धनगर समाजाच्या सोबत देखील उभा राहील असं आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत. पंढरपुरात आज होत असलेल्या विराट सभेत ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवरून भाजपवर निशाणा साधला.

अयोध्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा महत्वाचा दौरा मानला जात आहे. चंद्रभागेच्या मैदानात सभा घेण्याचं धाडस फक्त शिवसेना करू शकते असं म्हणत ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांचा उत्साह वाढविला. कुंभकर्णा जागा हो नाहीतर पेटलेला हिंदू सोडणार नाही. मी इथं कुंभकर्णाला जागा करण्यासाठी आलो आहे असं म्हणत आपल्या भाषणातून ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं.