इतर पर्याय खुले आहेत म्हणणाऱ्या शिवसेनेमुळेचं राज्यात राष्ट्रपती राजवट : सुधीर मुंनगंटीवार

blank

टीम महाराष्ट्र देशा : भाजपच्या झालेल्या कोरकमिटीच्या बैठकीत पुन्हा एकदा ‘वेट अँड वॉच’चा निर्णय झाला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहून भाजप पक्ष थांबून वाट बघणार आहे. तसेच राज्यावर आज जी वेळ आली आहे याला मित्रपक्षचं जबाबदार असल्याचं, भाजप नेते सुधीर मुंनगंटीवार यांनी म्हंटल आहे.

राज्याला सध्या स्थिर सरकारची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. मात्र अशा वेळी मित्रपक्ष शिवसेनेने आम्हाला इतर पर्याय खुले आहेत, असे म्हणत राज्यात अस्थिरता आली असल्याचंही सुधीर मुंनगंटीवार यावेळी म्हणाले.

राज्यातील एकही पक्ष सरकार स्थापनेसाठी दावा करू शकला नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने ही शिवसेनेला अद्याप पाठींबा दिलेला नाही. त्यामुळे अशा परिस्थितून मार्ग काढण्यासाठीचं भाजपने ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे, असे सुधीर मुंनगंटीवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या