शिवसेना आमदाराने विधानसभेतील राजदंड पळवला

अंगणवाडी सेविकांना लावलेल्या मेस्मा कायद्याला जोरदार विरोध

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसने व काँग्रेससह शिवसेनेन अंगणवाडी सेविकांना लावलेल्या मेस्मा कायद्याला जोरदार विरोध केला. कायदा मागे घ्यावा हि मागणी विरोधकांनी लाऊन धरली असतांना शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सभागृहातील राजदंड पळवला.

अजित पावर यांनी आक्रमक होत, सरकारने अंगणवाडी सेविकांवर मेस्मा लावण्याचा निर्णय घेतला आहे. या सेविका लहान मुलांचे संगोपन करत असतात. त्यांना दिवसाचे १५० रुपये मिळतात. १५० रुपयात दिवसभराचे जेवण तरी मिळते का? महिला दिन साजरा करायचा आणि अंगणवाडी सेविकांवर अन्याय करायचा? असे सरकारवर ताशेरे ओढले.

कॉंग्रेसने जोपर्यंत मेस्मा रद्द केला जात नाही. तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नसल्याची भूमिका घेतली. या गोंधळामुळे सकाळच्या सत्रात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहाचे कामकाज काही वेळासाठी तहकूब केले होते. नंतर कामकाज सुरू होताच पुन्हा एकदा या प्रश्नावरून गोंधळ सुरू झाला. त्याचवेळी सेनेचे आमदार चौगुले यांनी विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर असलेला राजदंड पळवला.

You might also like
Comments
Loading...