fbpx

मावळ लोकसभेच्या उमेदवारीवरुन शिवसेना-भाजप जुंपली

टीम महाराष्ट्र देशा – मावळ लोकसभेच्या उमेदवारीवरुन शिवसेना-भाजप पदाधिका-यांमध्ये गेल्या काही दिवासंपासून आपआपसात चांगलेच जुंपले आहे.
मावळचे शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी गेल्या साडेचार वर्षात सातत्याने भाजपवर टीका केली आहे. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते कमालीचे नाराज आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजप च्या कार्यकर्त्यांनी जिवाचे रान करून बारणे यांना निवडून आणले होते. त्यानंतर परंतु, निवडून आल्यानंतर बारणे यांनी त्याची जाणीव ठेवली नाही.

त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत बारणे हे जर शिवसेनेचे उमेदवार असले तर आणि युती झाल्यास आम्ही त्यांचे काम करणार नाही, अशी भूमिका भाजपच्या काही नगरसेवकांनी घेतली आहे. त्याबाबत नगरसेवकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तसे पत्र देत, बारणे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला आहे.
तर दुसरीकडे शिवसेनेच्या पदाधिका-यांनी तितक्याच आक्रमपणे भाजपच्या पदाधिका-यांन प्रत्युत्तर दिले आहे. बारणे यांच्या लोकप्रियतेने भाजपचे नेते हवालदिल झाले आहेत असल्याची टीका शिवसेनेच्या काही पदाधिका-यांनी केली आहे.

बारणे यांच्या उमेदवारीला विरोधात करणाऱ्या नगरसेवकांचा बोलविता धनी जनतेला ठाऊक असल्याचे देखील म्हटले आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला छुपी मदत करण्यासाठी आणि मागील निवडणुकीच्या पराभवाचे शल्य मनामध्ये ठेऊन वैयक्तिक स्वार्थापोटी पत्रकबाजी चालवली असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.

त्यामुळे खासदार बारणे यांच्या उमेदवारीवरुन भाजप आणि शिवसेनेमध्ये जुंपण्याची चिन्हे आहेत. भाजप खासदार बारणे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.