सोलापूर : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे प्रत्येक आषाढी वरीला पंढरपूरला येत असतात. यंदाही त्यांनी या परंपरेत खंड पडू दिलेला नाहीये.
आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला आलेल्या त्यांच्या मतदार संघातील वारकऱ्यांशी दानवेंनी भर पावसात चिखल तुडवत जाऊन संवाद साधला आणि त्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. त्याच प्रमाणे नव्याने राज्यात स्थापन झालेलं शिंदे – फडणवीस सरकार हे त्यांच अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास ही दर्शवला आहे.यावेळी त्यांच्यासोबत सोलापूरचे आमदार आणि माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख ही उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या:
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<