मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातआरोप झाल्यानंतर वनमंत्री संजय राठोड जनतेसमोर कधी येतात याची प्रतीक्षा सर्वांनाच लागली आहे. त्यांच्याशी संवाद व्हावा, त्यांच्यावर झालेल्या आरोपा संदर्भाने खुलासा व्हावा म्हणून माध्यमाचे प्रतिनिधी पोहरादेवी याठिकाणी डेरेदाखल आहेत. पोहरादेवी व संत सेवालाल महाराज यांचे दर्शन घेतल्यानंतर राज्य राठोड काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं होतं.
हजारोंच्या संख्येने राठोड समर्थक जमा झाले असून पोलिसांना जमावाला आवर घालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दोन आठवड्यांहून अधिक काळानंतर संजय राठोड हे माध्यमांसमोर आले असून त्यांची पत्रकार परिषद घेऊन गेल्या काही दिवसांपासून होणारे आरोप फेटाळून लावले आहेत.
याच पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी संजय राठोड यांच्यासह सरकार वर देखील सडकून टीका केलेली आहे. सध्या महाराष्ट्र सरकारमधी मंत्री गुन्हा करतात. आणि त्या गुन्ह्यापासून वाचण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ढाली समोर करतात. संजय राठोड यांनी या प्रकरणामध्ये समाजाची ढाल पुढे केली आहे. अशा प्रकारचा आरोप शेलार यांनी केला आहे.
तसेच या प्रकरणात जे आरोपी आहेत त्यांना वाचवण्यासाठी पोलिसांवर प्रचंड दबाव निर्माण केलेला आहे. जे कोणी आरोपी आहेत त्यांना सरकार श्रेय देत आहे. तसेच जे कोणी साक्षीदार या प्रकरणात उभे राहतील त्यांना पळवण्याचे काम हे सरकार करत आहे. असा आरोप देखील यावेळी शेलार यांनी सरकार वर केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- कर्नाटक सरकारचा आडमुठेपणा वाढला; महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर एसटी बसेस अडवल्या !
- भाजप आ.नमिता मुंदडा यांनी केली मागणी, महाविकास आघाडी सरकारने घेतली दखल
- ‘शिवजयंतीला नियम, पोहरादेवीला गर्दी; हेच का समसमान वाटप?’
- ‘मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला राठोड सर्मथकांचा हरताळ, आता ठाकरी बाणा दाखवून कारवाई करावी’
- ‘शिवजयंतीला शिवनेरीवर १४४ कलम लावणाऱ्या महाभकास आघाडीला आज कोरोनाची भिती वाटली नाही’