‘फुलाला सुंगध मातीचा’ मालिका ‘या’ कारणामुळे अडकली वादाच्या भोवऱ्यात

फुलाला सुगंध मातीचा

मुंबई : स्टार प्रवाह वरील ‘फुलाला सुंगध मातीचा’ ही सुप्रसिध्द मालिका  काही कारणामुळे वादात सापडली आहे. या मालिकेत नुकत्याच दाखवल्या गेलेल्या एका भूमिकेमुळे हा वाद निर्माण झाला आहे. याबाबत LGBT कम्युनिटीनं तक्रार दाखल केली आहे. या दृश्यांमुळं त्यांच्या भावना दुखावल्या असून या मालिकेद्वारे त्यांचा अपमान केला जातोय असा आरोप करत त्यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

‘फुलाला सुगंध मातीचा’ या मलिकेतील शुभम व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता हर्षद अतकरी एका स्पर्धेत भाग घेतो आणि याच स्पर्धेत सँडी नावाचा एक स्पर्धक देखील आहे. हा सँडी समलैंगिक आहे. या सँडीची त्यांच्या लैंगिकतेवरुन मालिकेत खिल्ली उडवली गेली असा आरोप केला जात आहे.

सँडीसोबत झालेल्या संवादात शुभमची आई त्याला त्याच्या बांगड्या, ज्वेलरी आणि इतरत् मेकअपचे साहित्य बहिणीला द्यायला सांगते. सँडी आणि जीजी अक्का यांच्यामध्ये दाखवण्यात आलेल्या दृश्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. यासाठी त्यांनी या विरोधात कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. मालिकेच्या निर्मात्यांनी याबाबत अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आता यावर काय भूमिका घेणार हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.

महत्वाच्या बातम्या

IMP