बँक कार्ड रिन्यू करायचे सांगून ज्येष्ठ महिलेला दोन लाखांचा गंडा

पुणे – बँक कार्डची मुदत संपली असून ते रिन्यू करायचे आहे, असे सांगून 63 वर्षांच्या ज्येष्ठ महिलेला एका अज्ञाताने दोन लाखांना लुबाडले आहे. जयलक्ष्मी रामण (वय 63, रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात तक्रार दाखल केली आहे.

bagdure

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञाताने रामण यांच्या मोबाईलवर फोन करुन मी बँकेचा मॅनेजर बोलत असून तुमच्या बँक कार्डची मुदत संपली असून ते रिन्यू करावे लागेल, असे सांगून बँक खात्याची सर्व माहिती काढून घेतली व महिलेची दोन लाख रुपयांना फसवणूक केली. याप्रकरणी अज्ञात मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

You might also like
Comments
Loading...