लोकसहभागातून सीना नदी पुनर्जीवन अभियान शंभर टक्के यशस्वी होईल : जिल्हाधिकारी

अहमदनगर / प्रशांत झावरे : लोकसहभागातून सीना नदी पुनर्जीवन अभियान शंभर टक्के यशस्वी होईल व त्याचा फायदा नगर शहरासह आसपासच्या सर्व शेतकऱ्यांना होईल आणि त्यातून अहमदनगरच्या वैभवात नक्कीच भर पडेल असा आत्मविश्वास अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केला, ते म्हणाले की, देशातील ३८ नद्यांचे पुनर्जीवन अभियान आर्ट ऑफ लिव्हिंगने श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी केले आहे. त्यामुळे उत्तम नियोजन व मनापासून कार्य करणारे स्वयंसेवकांच्या सहकार्याने आर्ट ऑफ लिव्हिंगचे सीना नदी पुनर्जीवन अभियान नक्की यशस्वी होईल, याचबरोबर सामूहिक प्रयत्नांतूनच सीना पुनर्जीवन होईल यशस्वी होईल असे मत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जेऊर बायजाबाई येथे व्यक्त केले.

आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार व जेऊर ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने सीना नदी पुनर्जीवन अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या शुभारंभ जेऊर येथे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सरपंच मधुकर मगर, भाऊसाहेब ससे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव गवारे, पद्माकर कुलकर्णी, सुजाता शेंडगे, गौतम मुनोत, सुरेखा जगदाळे, मेघना मुनोत, पवन झंवर, डॉ. महेंद्र शिंदे, घनश्याम दळवी, गणेश पवार आदी उपस्थित होते.

Loading...

जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले, निसर्गाने दिलेला अनमोल ठेवा जोपासला, तरच भविष्यात उत्तम जगता येईल. जलसंवर्धन आजच्या काळात महत्त्वाचे असून लोकसहभागातून सीना नदी पुनर्जीवन अभियान शंभर टक्के यशस्वी होईल. सध्या लोकांमध्ये जागरूकता व जाणीव वाढत असून शहरातून जाणाऱ्या सीना नदीच्या १० किलोमीटर पात्राच्या सफाईकामी आर्ट ऑफ लिव्हिंग नगर परिवाराने पुढाकार घेण्याचे आवाहन द्विवेदी यांनी केले.

सरपंच मधुकर मगर म्हणाले, आर्टऑफ लिव्हिंगने नि:स्वार्थ भावनेने हाती घेतलेला सीना नदी पुनर्जीवन प्रकल्पाचे महत्त्व ग्रामस्थ व शेतकऱ्यांना उमजले आहे. याचा फायदा संपूर्ण गावाला होणार असून पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगचे या सीना नदी पुनर्जीवन प्रकल्पाचे समन्वयक पद्माकर कुलकर्णी यांनी या उपक्रमाची माहिती दिली. आर्ट ऑफ लिव्हिंगचे गुरुवर्य रविशंकर यांच्यासंकल्पनेतून देशात नद्या पुनर्जीवन प्रकल्प राबवले जात आहेत.

आजपर्यंत ३८ नद्यांचे पुनर्जीवन पूर्ण करण्यात आले आहे. सीना नदी प्रकल्पाचा गेल्या दोन वर्षांत पूर्ण अभ्यास करून पाच टप्प्यात २८ किमी नदी पात्राचे रुंदीकरण व खोलीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. ३ मार्चला सुरू झालेले ससेवाडी ते जेऊर ६.४ किमी पात्राचे पहिल्या टप्प्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम जेऊर ते पिंपळगाव माळवी येत्या १५ दिवसांत पूर्ण होईल. यासाठी ग्रामस्थ व नदी पात्रालगतच्या शेतकऱ्यांनी आर्थिक योगदानही दिले आहे.

नगर शहरातून जाणाऱ्या सीना नदीची दुरवस्था दूर करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगकडे प्रोजेक्ट असून जिल्हाधिकारी व आर्ट ऑफ लिव्हिंगची लवकरच बैठक होणार असल्याची माहिती पद्माकर कुलकर्णी व गौतम मुनोत यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. महेंद्र शिंदे यांनी केले, तर आभार मेघना मुनोत यांनी मानले. जिल्हाधिकारी व उपस्थित मान्यवरांनी सीना नदी पुनर्जीवन अभियान पहिल्या टप्प्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
मी शरद पवारांसोबत जाणारचं... रामदास आठवले म्हणतात
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
आता इंदोरीकर महाराजांच्या कार्यक्रमाला युवासेनेच्या वाघांचे संरक्षण....