स्वयंघोषित गृहमंत्र्यांना हे पद आणि कुठलीच जबाबदारी झेपत नाही : धनंजय मुंडे

dhananjay mundhe and pankaja munde 2

पुणे : भाजप नगरसेवक विजय जोगदंड यांच्यावर अंबाजोगाई येथील रविवार पेठेतील पाण्याच्या टाकीजवळ हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आलीच्या घटना शुक्रवारी रात्री आठ वाजता ही घडली आहे. यामुळे अंबाजोगाईत खळबळ उडाली. त्यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जोगदंड यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यासोबतच यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर नाव न घेता आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून टीका केली आहे.

 

धनंजय मुंडे यांनी त्यांच्या ट्विटरवरून म्हटले आहे की, ‘अंबाजोगाईत नगरसेवकाची झालेली हत्या दुर्दैवी आणि दुःखदायक आहे. मृत विजय जोगदंड यांना श्रद्धांजली. बीडच्या कायदा-सुव्यवस्थेत मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे. बीडच्या स्वयंघोषित गृहमंत्र्यांना हे पद आणि कुठलीच जबाबदारी झेपत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे’.

पंकजा मुंडे या डिसेंबर महिन्यात लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त गोपीनाथगडावर आयोजित कार्यक्रमात म्हणाल्या होत्या की, ‘गृहमंत्री असताना मुंडे साहेबांनी महाराष्ट्रातील गॅंगवॉर संपवले होते. तसे, बीड जिल्ह्याच्या राजकारणातील गॅंगवार आपण संपविले आहे. त्यामुळे बीडची गृहमंत्री कोणी दुसरे कोणी नसून मीच आहे’.