नालासोपाऱ्यातील जप्त स्फोटकं मराठा मोर्चात घातपात घडवण्यासाठी होती,आव्हाडांचा सनसनाटी आरोप

टीम महाराष्ट्र देशा – वैभव राऊत व त्याच्या दोन साथीदारांकडून ATS ने जप्त केलेले जवळ-जवळ ८ क्रूड बॉम्ब आणि ५० बॉम्ब बनवण्याची सामुग्री ही मराठा आंदोलनाच्या दरम्यान घातपात करण्यासाठीच होती. महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा हा प्रयत्न होता असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित वैभव राऊत कडून मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा जप्त केल्यानंतर दहशतवादविरोधी पथकाने पुण्यातून काल संध्याकाळी दोघांना अटक केली होती. या प्रकरणाची व्याप्ती आज वाढली असून सकाळी केलेल्या कारवाईत पुण्यातून आणखी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तर राज्यभरातून एकूण 12 जणांना एटीएसने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

सनातन साधकाच्या घरात आढळला मोठा बॉम्ब साठा, घातपाताची शक्यता

पालघर बॉम्ब साठा प्रकरण; मुंबई, पुणे,सोलापूरमध्ये घातपात घडवण्याचा आरोपींचा कट

संविधान जाळल्याचा निषेध करत विद्यार्थ्यांनी पेटवली मनुस्मृती

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी