सुरक्षा व्यवस्था हायटेक झाली, शिक्षण व्यवस्था कधी होणार?

pune univarsity

पुणे : सावित्राबाई फुले विद्यापीठातील सुरक्षा व्यवस्था हायटेक करण्याचा निर्णय विद्यापीठाकडून घेण्यात आला. मात्र सध्या परीक्षा विभागातील गोंधळ तसेच शैक्षणिक प्रश्न कधी सुटतील आणि शिक्षण व्यवस्था कधी हायटेक होणार असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांनी बुधवारी पत्रकार परिषेदेत सुरक्षेचा आढावा घेत असतांना विद्यापीठातील सुरक्षा व्यवस्था अत्याधुनिक करण्यावर भर दिला. यामध्ये सुरक्षा रक्षकांची संख्या जवळपास १५० पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच नादुरस्त पथदिवे दुरस्त करून पथदिव्यांची संख्या वाढवण्यात येणार असून विद्यापीठात आवश्यक ठिकाणी सी सी टीव्ही कॅमेरा लावण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

विद्यापीठाची सुरक्षा व्यवस्था हायटेक करण्याचा विचार असतांना वास्तविक पाहता परीक्षा विभागामध्ये गेल्या सहा महिन्यापासून प्रचंड गोंधळ सुरु आहे. त्यामध्ये पेपर फुटी, पुनर्मुल्यांकनाचा विषय, सेट विद्यार्थी प्रकरण असेल तसेच विद्यार्थांच्या गुण पत्रिकेवरील चुका असतील. त्यामुळे एकीकडे विद्यापीठाची सुरक्षा व्यवस्था हायटेक करत असतांना शिक्षण व्यवस्था कधी हायटेक होणार असा प्रश्न आता विद्यार्थांनी विचारला आहे. विद्यापीठातील परीक्षा विभागात नेहमी सावळा गोंधळ पाहायला मिळतो. विद्यार्थांचे फोन न उचलणे, त्यांचे प्रश्न न सोडवणे तसेच विभागातील कर्मचारी सुद्धा अडचणी घेऊन आलेल्या विद्यार्थांशी सवांद साधतांना चालढकल करतात. त्यामुळे विद्यार्थांना आंदोलन व उपोषण करावे लागतात.

विद्यापीठातील सुरक्षा हायटेक करणाऱ्या निर्णयाच स्वागत आहे मात्र विद्यापीठात आजही विद्यार्थांना असंख्य प्रश्न आहेत. ते सुद्धा हायटेक रित्या सोडवावे. विद्यापीठातील सुविधा केंद्रात फक्त अर्ज स्वीकारण्याच काम केल्या जाते निर्णय काहीच होत नाही. तसेच सुविधा केंद्रात पिऊनच्या हातून कामे केले जातात कोणतेही अधिकारी लक्ष देत नाहीत.
सागर पवार, अध्यक्ष मनविसे पुणे विद्यापीठ

विद्यार्थी केंद्रबिंदू ठेऊन विद्यापीठाने काम करावे. सुरक्षा व्यवस्था सुद्धा गरजेची आहे पण सोबतच विद्यार्थांचे मुलभूत प्रश्न सुद्धा महत्वाचे आहेत. परीक्षा विभागातील कर्मचारी नेहमी चालढकल करतात. विद्यापीठात विद्यार्थांसाठी रोजगारभिमुख योजना राबवण्यात यावी जनेकरून विद्यार्थांना रोजगार मिळेल.
कुलदीप आंबेकर, जेडीयु पुणे विद्यापीठ