अमेरिकेच्या सैन्यासोबतचे गुप्त संबंध तोडणार ; पाकिस्तान

us-pak

टीम महाराष्ट्र देशा: पाकिस्तानचे संरक्षणमंत्री खुर्रम दस्तगीर खान यांनी अमेरिकेच्या सैन्यासोबतचे आणि गुप्त संबंध तोडत असल्याची घोषणा केली. द डॉन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या आरोपांनंतर पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानवर खोटारडेपणाचा आणि धोका दिल्याचा आरोप केला होता. यानंतर ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानला सुरक्षेसाठी देण्यात येणारी आर्थित मदत थांबवली होती. त्यामुळे पाकिस्तान सरकारने हा निर्णय घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

खुर्रम दस्तगीर म्हणाले, ‘करोडो डॉलर खर्च केल्यानंतरही अमेरिकेला अफगाणिस्तानात पराभवचा सामना करावा लागत आहे. अफगाणिस्तानमधील आपलं अपयश झाकण्यासाठी अमेरिका पाकिस्तानला बळीचा बकरा म्हणून वापरत आहे त्यामुळे अमेरिकेसोबत सैन्य आणि गुप्त संबंध तोडणार आहोत. तसेच पाकिस्तान आपल्या बलिदानाची किमंत मागत आहे. अमेरिकेला ठणकावत ‘पाकिस्तानच्या जमिनीवरुन अमेरिकेला अफगाणिस्तानसोबत युद्ध लढण्याची परवानगी दिली जाणार नाही. अमेरिका अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमारेषेवरील सुरक्षेसाठी मदत देण्याऐवजी पाकिस्तानवर आरोप लगावण्यात व्यस्त आहे’. असे म्हणाले.